India Corona Update : गेल्या 24 तासांत 19,299 रुग्ण कोरोनामुक्त, 96.41 टक्के रिकव्हरी रेट 

एमपीसी न्यूज – मागील 24 तासांत देशभरात 19 हजार 299 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 75 हजार 950 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 96.41 टक्के एवढा आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासांत 18 हजार 645 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 201 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावाढीसह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 04 लाख 50 हजार 284 एवढी झाली आहे. देशात सध्याच्या घडीला 2 लाख 23 हजार 335 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

आजवर देशात 18 कोटी 10 लाख 96 हजार 622 नमुने तपासण्यात आले आहेत. शनिवारी (दि.9) त्यापैकी 8 लाख 43 हजार 307 नमुने तपासण्यात आले आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

 

 

देशभरात आजवर 1 लाख 50 हजार 999 एवढे रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. गेल्या 24 तासांत 201 रुग्ण दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे.

भारतात येत्या 16 जानेवारीपासून लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार आहे. त्यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना नागरिकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी नागरिकांचं लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.