India Corona Update : मागील 24 तासांत 26,382 नवे रुग्ण, 33,813 जण कोरोनामुक्त 

एमपीसी न्यूज – मागील चोवीस तासांत देशभरात 26 हजार 382 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 33 हजार 813 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 95.20 टक्के एवढा झाला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 99 लाख 32 हजार 548 एवढी झाली आहे. त्यापैकी 94 लाख 56 हजार 449 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 3 लाख 32 हजार 002 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

मागील 24 तासांत देशभरात 387 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत देशात 1 लाख 44 हजार 096 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.45 टक्के एवढा आहे.

देशात आज घडीला 15 कोटी 66 लाख 46 हजार 280 नमूने तपासण्यात आले आहेत. मंगळवारी (दि.15) त्यापैकी 10 लाख 85 हजार 625 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक 71 हजार 356 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याखालोखाल केरळमध्ये 57 हजार आणि पश्चिम बंगाल मध्ये 20 हजार सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय कर्नाटक, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.