India Corona Update : गेल्या 24 तासांत 27,071 नवे कोरोना रुग्ण, 30,695 जण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – मागील 24 तासांमध्ये देशभरात 27 हजार 71 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. तर, 30 हजार 695 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला. याशिवाय, 336 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद देखील झाली आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता 98 लाख 84 हजार 100 वर पोहचली आहे.

देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 93 लाख 88 हजार 159 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. सद्यस्थितीस देशात 3 लाख 52 हजार 586 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय आतापर्यंत देशभरात 1 लाख 43 हजार 355 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 336 रुग्ण मागील 24 तासांत दगावले आहेत.

देशभरात आतापर्यंत 15 कोटी 45 लाख 66 हजार 990 नमुने तपासण्यात आले. यापैकी 8 लाख 55 हजार 157 नमुने काल तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियातर्फे कोविड-19 लसीकरणाची मोहीम भारतात जानेवारीपर्यंत सुरू होण्याची शक्यता असल्याचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. या लसीच्या आणीबाणीकालीन वापरासाठी चालू महिना अखेपर्यंत आपल्याला परवानगी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ऑक्सफर्ड विद्यापीठ- अ‍ॅस्ट्राझेनेका यांची कोव्हीशिल्ड हि लस सीरम येथे विकसित केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.