India Corona Update : गेल्या 24 तासांत 31,118 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 94.62 लाखांवर

एमपीसी न्यूजदेशात गेल्या 24 तासांत 31 हजार 118 कोरोना रुग्णांची नव्यानं वाढ झाली असून, 482 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत झालेल्या वाढीमुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 94 लाख 62 हजार 810 एवढी झाली आहे

 

मागील 24 तासांत 41 हजार 985 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 88 लाख 89 हजार 585 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 4 लाख 35 हजार 603 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

 

 

देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.94 टक्के एवढं झाले आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 37 हजार 621 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील मृत्यूचे प्रमाण 1.45 टक्के एवढं आहे.

आयसीएआरच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 14 कोटी चाचण्या पूर्ण झाल्या असून, देशातील चाचणी प्रमाण वाढवण्यात आले आहे.

देशात आज सलग दुसऱ्या दिवशी नव्यानं वाढ होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आजच्या रुग्णांची संख्या मागील काही दिवसापासून होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, देशातील आठ राज्यात संसर्गाचा वेग अधिक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.