India Corona Update : गेल्या 24 तासांत 3,82,315 नवे रुग्ण, 3,38,439 जणांना डिस्चार्ज 

0

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असून, दररोज साडे तीन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 82 हजार 315 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 

दिलासादायक बाब म्हणजे बरे होणा-या रुग्णांची संख्या देखील वाढली असून, गेल्या 24 तासांत 3 लाख 38 हजार 439 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 06 लाख 65 हजार 148 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 69 लाख 51 हजार 731 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या 34 लाख 87 हजार 229 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

_MPC_DIR_MPU_II

 मागील 24 तासांत 3 हजार 780 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 26 हजार 188 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.09 टक्के एवढा आहे‌. देशाचा रिकव्हरी रेट 82 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 29 कोटी 48 लाख 52 हजार 078 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 15 लाख 41 हजार 299 चाचण्या मंगळवारी (दि.04) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 16 कोटी 04 लाख 94 हजार 188 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment