India Corona Update : मागील 24 तासांत 45 हजार 230 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 82 लाखांच्या पुढे

एमपीसी न्यूज – मागील 24 तासांत देशभरात 45 हजार 230 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 82 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात जवळपास साडेपाच लाख सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 82 लाख 29 हजार 313 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 5 लाख 61 हजार 908 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब आहे म्हणजे,

75 लाख 44 हजार 798 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत.

देशात मागील 24 तासांत 496 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1 लाख 22 हजार 607 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.48 टक्के एवढा आहे. मागील 24 तासांत 53 हजार 288 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून देशाचा रिकव्हरी रेट 91.68 टक्के एवढा झाला आहे.

देशाने आतापर्यंत 11 कोटी चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. मागील 24 तासांत देशात  8 लाख 55 हजार 500 नमूणे तपासण्यात आले आहेत. देशात आतापर्यंत  11 कोटी 07 लाख 43 हजार  103 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.