India Corona Update : गेल्या 24 तासांत 45,674 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 85 लाखांच्या पुढे

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 45 हजार 674 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 85 लाखांच्या पुढे गेली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर ताज्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 85 लाख 07 हजार 754 एवढी झाली आहे. त्यापैकी 78 लाख 68 हजार 968 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या देशात 5 लाख 12 हजार 665 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  मागील 24 तासांत देशभरात 559 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत देशात 1 लाख 26 हजार 121 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. मागील 24 तासांत 49 हजार 082 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 92.49 टक्के एवढा झाला आहे असून 1.48 टक्के एवढा मृत्यूदर आहे.

आयसीएआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 11 कोटी 77 लाख 36 हजार 791 नमूणे तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 11 लाख 94 हजार 487 नमूणे तपासण्यात आले आहेत. देशातील कोरोना चाचणीचे प्रमाण अधिक असून त्याप्रमाणात आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या कमी आहे.

गेल्या 24 तासांत नव्यानं वाढ झालेल्या रुग्णांपैकी 76 टक्के रुग्ण हे फक्त दहा राज्यातील आहेत. तर बरे झालेल्या 49 हजार 082 हे रुग्णांपैकी 76 टक्के रुग्ण देखील याच दहा राज्यातील आहेत. यामध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, केरळ, दिल्ली, पश्चिम बंगाल, हरियाणा व राजस्थान यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.