India Corona Update : गेल्या 24 तासांत 46,232 नवे कोरोना रुग्ण तर, 564 मृत्यू 

एमपीसी न्यूजदेशात मागील 24 तासांत 46 हजार 232 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर, 564 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 90 लाख 50 हजार 598 एवढी झाली आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 32 हजार 726 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 84 लाख 78 हजार 124 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 4 लाख 39 हजार 747 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा कोरोना रिकव्हरी रेट 93.67 टक्के एवढा आहे तर मृत्यूदर 1.46 टक्के एवढा आहे.

देशात आतापर्यंत 13 कोटी 06 लाख 57 हजार 808 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी 10 लाख 66 हजार 022 चाचण्या शुक्रवारी (दि.20) पूर्ण करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेश या राज्यांत मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. दिवाळीनंतर रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील आहे मागील 24 तासांत देशभरातून 49 हजार 715 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.