India Corona Update : गेल्या 24 तासांत 47,638 नवे रुग्ण तर, 670 मृत्यू 

एमपीसी न्यूज – भारतात मागील 24 तासांत 47 हजार 638 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 84 लाख 11 हजार 724 एवढी झाली आहे तर मृतांची संख्या 1 लाख 24 हजार 985 एवढी झाली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 5 लाख 20 हजार 773 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे,  आतापर्यंत 77 लाख 65 हजार 966 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत त्यापैकी, 54 हजार 157 रुग्ण गेल्या 24 तासांत बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 92.32 टक्के एवढा झाला आहे.

मागील 24 तासांत देशभरात 670 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील मृतांची संख्या  1 लाख 24 हजार 985 एवढी झाली आहे. देशातील कोरोना मृत्यू दर 1.48 टक्के एवढा खाली आला आहे. आयसीएआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत अकरा कोटी पेक्षा अधिक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.

कोरोना लस तयार करण्यात भारत कोणत्याही देशांच्या तुलनेत कमी नाही. देशात जवळपास चार लसींची वेगवेगळ्या टप्प्यांवर ट्रायल सुरू आहेत. पुढल्या वर्षीच्या मध्यापर्यंत देशातील 20 ते 25 कोटी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.