India Corona Update : गेल्या 24 तासांत  54,044 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 76.51 लाखांवर 

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत 54 हजार 044 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 76 लाख 51 हजार 108 वर जाऊन पोहचली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 7 लाख 40 हजार 090 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर तब्बल 67 लाख 95 हजार 103 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 61 हजार 775 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 देशभरात 9 कोटी 72 लाख 379 तपासण्यात आले. त्यापैकी 10 लाख 83 हजार 608 नमूने मंगळवारी (दि.20) तपासण्यात आले. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

मागील 24 तासांत देशात 717 रुग्ण दगावले आहेत आत्तापर्यंत देशात 1 लाख 15 हजार 914 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून देशातील सक्रिय रुग्णांची संख्या साडे सात लाखांच्या आताच राहिली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.51 टक्के एवढा खाली आला असून 14 राज्यात मृत्यूदर हा 1 टक्के एवढा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III