_MPC_DIR_MPU_III

India Corona Update : गेल्या 24 तासांत देशात 90 मृत्यू, 11,649 नव्या बाधितांची नोंद 

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत देशभरात 11 हजार 649 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून, 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 09 लाख 16 हजार 589 एवढी झाली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

आरोग्य मंत्रालाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 06 लाख 21 हजार 2220 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 9 हजार 489 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 97.31 टक्क्यांवर पोहोचला आहे.

_MPC_DIR_MPU_II

मागील काही दिवसांपासून दररोज बरे होणा-या रुग्णांची संख्या कमी झाल्याने देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होत होताना दिसत आहे. सध्याच्या घडीला देशात 1 लाख 39 हजार 637 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 20 कोटी 67 लाख 16 हजार 634 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 4 लाख 86 हजार 122 नमून्यांची तपासणी रविवारी (दि.14) करण्यात आली आहे.

 

गेल्या 24 तासांत देशभरात 90 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 55 हजार 732 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.43 टक्के एवढा आहे‌. देशात आतापर्यंत 82 लाख 85 हजार 295 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

 

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.