India Corona Update: गेल्या 24 तासांत ‘उच्चांकी’ 20,903 कोरोना बाधितांची भर; रूग्ण बरे होण्याचा दर 60 टक्क्यांच्या वर

In the last 24 hours, the highest number of 20,903 corona sufferers, while 379 died; Patient recovery rate at 60 percent in india कोरोनावर तयार करण्यात आलेली पूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस 'कोव्हॅक्सिन' ही 15 ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता आयसीएमआरनं वर्तवली आहे.

एमपीसी न्यूज – देशात कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या वेगाने वाढत आहे. आज पहिल्यांदा देशात तब्बल नवीन कोरोना रुग्णांचा आकडा 21 हजारांच्या घरात गेला. गेल्या 24 तासांत तब्बल 20 हजार 903 रुग्ण सापडले. तर, 379 लोकांचा मृत्यू झाला.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 25 हजार 544 एवढी झाली आहे. देशात सध्या 2 लाख 27 हजार 437 सक्रिय रुग्ण आहेत.

तर, 18 हजार 213 लोकांचा मृत्यू झाला आहे.  रुग्णांची संख्या वाढत असली तरी भारतातील मृत्यू दर 2.91 टक्के इतका मर्यादित ठेवण्यात यश आले आहे.  दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 3 लाख 79 हजार 891 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात रूग्ण बरे होण्याचा दर 60% झाला आहे.  दरम्यान, जागतिक मृत्यू दर हा 4. 77 इतका आहे.


आतापर्यंत देशात महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत 93 लाखांहून अधिक जणांची चाचणी करण्यात आली आहे.

दरम्यान, आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार 2 जुलैपर्यंत एकूण 92,97,749 नमुने तपासले आहेत. यापैकी गेल्या 24 तासांत देशात 2,41,576 नमुन्यांची चाचणी गुरुवारी करण्यात आली.

कोरोनावर तयार करण्यात आलेली पूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस ‘कोव्हॅक्सिन’ ही 15 ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता आयसीएमआरनं वर्तवली आहे.

भारत बायोटेकनं आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआरद्वारे ही लस 15 ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.