India Corona Update : देशात गेल्या 24 तासांत 50,129 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 78.64 लाखांवर 

एमपीसी न्यूज  – देशात गेल्या 24 तासांत  50 हजार 129 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.  यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 78.64 लाखांवर पोहचली आहे.  देशातील रुग्ण वाढीचा वेग मंदावला असून  देशात नव्याने वाढ होणार्‍या रुग्णांची संख्या कमी होत असून बरे होणार्‍या रुग्णांची संख्या वाढली आहे.  

देशात गेल्या 24 तासांत 62 हजार 077 रुग्ण  उपचारानंतर बरे झाले असून आत्तापर्यंत 70 लाख  78 हजार  123 जण बरे झाले आहेत. देशात सध्या  6 लाख  68 हजार 154 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 90 टक्यांवर  पोहचला आहे तर, फक्त 8.49 टक्के सक्रिय रुग्ण आहेत.

देशात गेल्या 24 तासांत 578 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यू दर 1.50 टक्के एवढा झाला आहे. देशात गेल्या 24 तासांत 11 लाख  40 हजार 905 नमुने तपासण्यात आले आहेत.देशात आत्तापर्यंत 10 कोटी  25 लाख  23 हजार  469 नमूने तपासण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.