Pune : पालिकेत उपायुक्तांची रिक्त नऊ पदे भरणार

एमपीसी न्यूज – महापालिकेत शासन नियुक्त उपयुक्तांची सात पदे रिक्त आहेत. ती लवकरच शासनाकडून भरण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. प्रशासकीय कामकाज सुरळीत करण्यासाठी ही पदे भरण्याची विनंती शासनास केली होती. त्याला नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर यांनी सहमती दर्शविल्याची सौरभ राव यांनी सांगितले.

महापालिकेच्या सुधारित सेवा प्रवेश नियमावली नुसार पालिकेत 18 उपयुक्तांची पदे आहेत. त्यातील 9 पदे महापालिका अधिकारी तर 9 पदे शासन नियुक्त अधिकाऱ्यांसाठी आहेत. पालिकेच्या सर्व उपायुक्तांच्या जागा भरल्या असून शासन उपायुक्तांच्या 7 जागा रिक्त आहेत. त्यामुळे या पदाचा भार इतर अधिकाऱ्यांकडे देण्यात आला असून त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार येत आहे.

त्यामुळे अनेक प्रशासकीय कामे रखडली आहेत. त्यामुळे नगरसेवकांकडून वारंवार मुख्य सभा , स्थायी समिती बैठकीत विकासकामांवरून तक्रारी केल्या आहेत. तसेच, शहर विकास कामे रखडली आहेत ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रलंबित प्रश्नांसाठी मागील आठवड्यात मुंबईमध्ये केलेल्या आयुक्त सौरभ राव यांनी रिक्त उपायुक्तांची पदे भरण्याची मागणी केली होती. त्यास शासन अनुकूल असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.