BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : प्रवाशाचे साडेअकरा तोळे सोन्याचे दागिने व इतर साहित्य चोरीचा गुन्हा २० तासांत उघड

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज : उंब्रज ते मुंबई प्रवासा दरम्यान एका प्रवाशाने प्रवासी स्विफ्ट डिझायर गाडीच्या डिक्कीत विश्वासाने ठेवलेले साडे अकरा तोळे सोने व इतर साहित्य घेऊन फरार झालेल्या कार चालकाला लोणावळा शहर पोलिसांनी 20 तासात मुद्देमालासह अटक केली.

अमीत आप्पासो चव्हाण (रा. गोदरेज कॉलनी, विक्रोळी, मुंबई), असे या अटक केलेल्या चालकाचे नाव आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप सपकाळ (रा. शिवाजीनगर, मुंबई) हे गुरुवार दिनांक ९ मे रोजी एका खाजगी स्विफ्ट कारमधून उंब्रज ते मुंबई असा प्रवास करीत असताना चालकाच्या विनंतीवरून चहापाणी घेण्यासाठी वलवण लोणावळा येथील हाॅटेल एनएच 04 या धाब्यावर थांबले होते. त्यावेळी त्यांचे सुमारे ११.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व इतर साहित्य असलेली त्यांची बॅग त्यांनी त्यांच्या स्वीफ्ट कारच्या डिक्कीत ठेवली होती. फिर्यादी सपकाळ व अन्य एक प्रवासी हे चहापाणी करीत असताना या कारच्या चालकाने लबाडीच्या इराद्याने त्यांना धाब्यावरच सोडून या बॅगेसह तेथून पोबारा केला.

सपकाळ यांनी परिसरात शोधाशोध करत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. मात्र, गाडीचा नंबर व चालकाचे नाव यापैकी काहीच त्यांना माहित नव्हते. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे व पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत सपकाळ यांनी वर्णन केलेल्या कारचे उंब्रज ते लोणावळा दरम्यानच्या टोलनाक्यांवरील फुटेज तपास करत कारचा माग काढला. पहाटे 4.30 वाजता चालक आरोपी नामे अमीत आप्पासो चव्हाण, रा. गोदरेज कॉलनी, विक्रोळी, मुंबई यास त्याच्या सासुरवाडीतून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 3 लाख 84 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल व गुन्हा करण्यास वापरलेली कार, असा एकूण 10 लाख 84 हजार 500 रुपयांचा माल लोणावळा पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. लोणावळा स्थानिक गुन्हे विभागाचे सामिल प्रकाश, जयराज देवकर यांच्या टीमने ही कामगिरी बजावली.

HB_POST_END_FTR-A2

.