_MPC_DIR_MPU_III

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – बौद्ध पौर्णिमा पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्वाचा सण म्हणजे बौद्ध पौर्णिमा होय. भारतात सर्वत्र वैशाख पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा करण्यात येतो. याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला, याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच दिवशी बुद्धांचे महानिर्वाण झाले. या तीन कारणांमुळे हा दिवस विशेष आहे.

_MPC_DIR_MPU_IV

जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 2 मे 1950 रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. तेंव्हापासून भारतात बौद्ध जयंतीची सुरुवात झाली.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड शहरात बौद्ध धर्मीयांच्या घरामध्ये, बौद्ध विहारांमध्ये दिवे प्रज्वलित केले. बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथांचे अखंड वाचन, पठण केले. बौद्ध बांधवांनी घरांमध्ये फुलांची सजावट तसेच बुद्ध मूर्तीवर फळे-फुले चढवून अगरबत्त्या व दिवे लावून पूजा करण्यात आली. काही ठिकाणी बोधीवृक्षाची पूजा करण्यात आली. बोधीवृक्षाच्या फांद्यांवर हार व रंगीत पताका सजवण्यात आल्या. मुळांना दूध व सुगंधित पाणी देऊन वृक्षाच्या भोवती दिवे लावले.

बौद्ध बांधवांतर्फे या दिवशी गरिबांना भोजन व वस्त्र दिले जाते. बौद्ध अनुयायींना प्रार्थना करता यावी यासाठी दिल्ली येथील बौद्ध संग्रहालयातील बुद्धांच्या अस्थी बाहेर काढून ठेवल्या जातात. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बुद्धांची शिकवण आयुष्यात आणण्याचा संकल्प केला जातो. पिंपरी-चिंचवड शहरात देखील बौद्ध बांधवांनी विविध संकल्प राबवून गौतम बुद्धांना नमन केले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.