Pune : वकीलावर गोळीबार करणारे पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्युज – येरवडा येथे काल सोमवारी(दि.22) वकीलावर झालेल्या गोळीबारातील दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट1 च्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

कुमारदास बडे (वय 32, रा.शिरुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातील केस लढण्यासाठी ऍड.देवानंद ढोकणे यांनी 2 लाखांची फिस घेतली होती.परंतु तो वाद न्यायालयाच्या बाहेरच मिटविण्यात आला.त्यामुळे आरोपीनी त्यांना दिलेली 2 लाखांची फी परत मागितली व ती परत न केल्याने आरोपीने आपल्या साथीदारासोबत काल वकीलावर गोळीबार केला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.