SSC Result : दहावी रिपिटरच्या निकालात पुणे विभाग दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (SSC Result) वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता दहावी) पुणे विभाग फ्रेश विद्यार्थ्यांच्या निकालात तिसऱ्या स्थानी आहे. तर रिपिटर विद्यार्थ्यांच्या निकालात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Pimple Saudagar : ऑनलाइन टास्कच्या बहाण्याने 16 लाखांची फसवणूक

राज्यभरातून रिपिटर म्हणून 37 हजार 704 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील 36 हजार 6४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्यांमधून 22 हजार 320 विद्यार्थी पास झाले आहेत. राज्याचा रिपिटर विद्यार्थ्यांचा निकाल 60.90 टक्के लागला आहे. पहिल्या क्रमांकावर कोकण विभाग आहे. कोकण विभागाचा निकाल 73.81 टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ पुण्याचा (SSC Result ) क्रमांक लागला आहे.

पुणे विभागात रिपिटर म्हणून सात हजार 763 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील सात हजार 547 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील चार हजार 854 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. याची टक्केवारी 64.31 एवढी आहे. तर दोन हजार 693 विद्यार्थी पुन्हा अपयशी झाले आहेत.

 

https://youtu.be/guYSCjSMRvQ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.