Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 3,623 नवे कोरोना रुग्ण, 46 रूग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात काल (रविवारी ) दिवसभरात 3 हजार 623 नवीन क़रोना बाधित आढळून आले असून, 2 हजार 972 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच, 46 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या 64 लाख 97 हजार 877 झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत एकूण 63 लाख 05 हजार 788 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.04 टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आजपर्यंत 1 लाख 38 हजार 142 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

राज्यात आजपर्यंत 5 कोटी 59 लाख 79 हजार 898 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 98 हजार 207 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.