BNR-HDR-TOP-Mobile

Pune : व्हीआयआयटी उप-उपांत्यपूर्व फेरीत

सृजन करंडक 2019 फुटबॉल

एमपीसी न्यूज – विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फरमेशन टेक्‍नॉलॉजी (व्हीआयआयटी) दोन्ही सत्रात एकेक गोल करत मॉडर्न कला, वाणिज्य आणि शास्त्र कॉलेजचा 2-0 असा पराभव करून येथे सुरु असलेल्या सृजन करंडक 2019 फुटबॉल स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

ढोबरवाडी येथील पीडीएफएच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पावसामुळे झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत “व्हीआयआयटी’च्या खेळाडूंनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून पूर्वार्धात 18व्या मिनिटाला खाते उघडले. त्या वेळी आयुष जैन याने गोल केला. व्हीआयआयटीने मध्यंतरापर्यंत 1-0 अशी आघाडी कायम राखली.
उत्तरार्धात सुरवातीलाच व्हीआयआयटीने आपली आघाडी वाढवली. सामन्याच्या 36व्या मिनिटाला याज्ञिक थोरात याने गोल केला. त्यानंतर ही आघाडी कायम राखत याच आघाडीवर विजय मिळविला.

पावसामुखे मैदानाची अवस्था खराब झाल्याने उद्या सोमवारी (ता. 9) एकही सामना खेळविला जाणार नाही.

निकाल –
व्हीआयआयटी, पुणे 2 
(आयुष जैन 18, याज्ञिक थोरात 36वे मिनिट) वि.वि. मॉडर्न कला, वाणिज्य, शास्त्र कॉलेज 0. मध्यंतर 1-0

HB_POST_END_FTR-A2

.