Pune : या दुनियेत सत्तेचा नव्हे तर सत्याचा विजय होतो – गिरीश बापट

एमपीसी न्यूज –  मी कोणाचा लाडका आहे हे सांगणारे, ते माझे नेते संजयनाना. त्यांची एकदा कुंडली पहिली पाहिजे. नाना तुम्ही भाजपची पार्टी लावली आहे. तुमचे भविष्य खरे ठरणार आहे. फक्त भाजप हटाव म्हणून काही स्वार्थी लोक एकत्र येतात. देशात मोदीजी आणि राज्यात चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप काम करत आहे. मुस्लिम समाजाला आज भयभीत केले जात आहे. ब्रिटिशांना जे जमले नाही, ते काँगेसलाही जमणार नाही. आपण सकारात्मक विचार करणारे आहोत. या जगात सत्तेचा नाही तर सत्याचा विजय होतो, असे मार्गदर्शन खासदार गिरीश बापट यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. 

भारतीय जनता पार्टी, पुणे शहर संघटन पर्व कार्यकर्ता मेळाव्यात बापट बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, राज्यसभेचे खासदार संजयनाना काकडे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेता धीरज घाटे उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

बापट पुढे म्हणाले, भाजपने कधीही जातीयवाद मानला नाही. अब्दुल कलाम यांना राष्ट्पती केले. 370 कलम रद्द केले,  तीन तलाक पद्धत रद्द केली, मुस्लीम म्हणून नव्हे तर महिलांच्या प्रश्न वर्षांपासून प्रलंबित होता. हे प्रश्न मोदीजींनी सोडविले.
ग्रामीण नक्षलवाद बिमोड केला. त्याची काही पिल्लावड शहरी नक्षलवाद आहे. त्यांचे स्थान स्मशानात आहे. कोणती वाईट घटना मोदींजींच्या काळात घडली? असा सवालही बापट यांनी उपस्थित केला.

भाजपच्या नावावर केवळ कार्यकर्त्यांचे नाव आहे. या पक्षात गटागटाला स्थान नाही. कोणीतरी म्हटले जगदीश मुळीक माझे जवळचे आहेत, ते आहेच, जे पक्षासाठी काम करतात, ज्यांना झोकून देऊन काम करायचे असते, ते महत्वाचे असते. संघटन मजबूत करण्यासाठी मुळीक यांची निवड झाली. आज तरुण नेतृत्वाची निवड झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू. संपूर्ण शहर आपल्या मागे उभे राहू, असेही बापट म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.