India Corona Update : चोवीस तासांत 6,358 नवे कोरोना रुग्ण, 6,450 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 6 हजार 358 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 6 हजार 450 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला देशात 75 हजार 456 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 47 लाख 99 हजार 691 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 42 लाख 43 हजार 945 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.देशाचा रिकव्हरी रेट देखील वाढून 98.40 टक्के एवढा झाला आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 293 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 4 लाख 80 हजार 290 कोरोना रुग्ण दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.38 टक्के एवढा झाला आहे. लसीकरणात देश आघाडीवर असून आजवर 142.47 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.

देशात आतापर्यंत 67 कोटी 40 लाख 78 हजार 531 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या 24 तासांत 10 लाख 35 हजार 495 नमूने तपासण्यात आले आहेत. ‘आयसीएमआर’ने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

दरम्यान, भारतात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सध्या देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 653 झाली असून, त्यापैकी दिल्लीत 167 तर, महाराष्ट्रात 165 रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 578 पैकी 186 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.