Chakan News : वासुलीमध्ये पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी

दोन्ही गटातील नऊ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चाकण जवळ वासुली येथे दोन गटात जुन्या भांडणाच्या कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. कोयता, लोखंडी पाईप आणि लाथाबुक्क्यांनी दोन्ही गटातील लोकांनी मारहाण केली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटातील नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश निवृत्ती शेळके (वय 30, रा. वासुली, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामदास सोपान शेळके, लक्ष्मण सोपान शेळके, प्रतिक रामदास शेळके, प्रशांत लक्ष्मण शेळके, सुरेखा लक्ष्मण शेळके, मंगल रामदास शेळके (सर्व रा. वासुली, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश यांच्या फिर्यादीनुसार, फिर्यादी आणि राकेश भागुजी वायकर हे दोघेजण फिर्यादी यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांना कोयता, लोखंडी पाईप आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या कारची (एम एच 14 / जी डी 5951) तोडफोड करून नुकसान केले.

याच्या परस्पर विरोधात रामदास सोपान शेळके (वय 57) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश निवृत्ती शेळके, संतोष निवृत्ती शेळके, राकेश भागुजी शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदास यांच्या फिर्यादीनुसार, फिर्यादी, प्रतिक शेळके, प्रशांत शेळके हे त्यांच्या घरासमोर उभे असताना आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून मसाला हवेत फेकून लोखंडी पाईप, दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.

दोन्ही प्रकरणांमध्ये कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचे देखील उल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.