Pimpri : चेकिन रिऍलिटीच्या नूतन कार्यालयाचे आमदार आण्णा बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन 

एमपीसी न्यूज – लोकांना त्यांच्या स्वप्नातील घरे परवडणा-या किंमतीत उपलब्ध करून देणारे चेकिन रिअॅलिटी यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन आमदार आण्णा बनसोडे आणि नगरसेवक शैलेश मोरे यांच्या हस्ते पार पडले.

गेली पंधरा वर्षापासून लोकांना त्यांच्या स्वप्नातील घरे त्यांच्या बजेटमध्ये मिळवून देण्यास चेकिन रियॅलिटी मदत करत आली आहे. तसेच घर विकताना ग्राहकांना व्यवसायिक सुविधाही  उपलब्ध करून देण्यात मदत करत आहेत. चेकिन रियॅलिटी बरोबर या व्यवसायातील  आय.आय.एम आणि आय.आय.टी मधून शिक्षण घेतलेले  अनुभवी लोक आहेत.

चेकिन रियॅलिटी नामांकित बिल्डर्स जसे रुणवाल, लोढा, गोदरेज, कल्पतरू, कोलतेपाटील, सुखवानी तसेच आगरवाल ग्रुप, महिंद्रा लाईफस्पेस आणि पुणे परिसरातील अशा अनेक  बिल्डर्स चे अधिकृत विक्रेते आहेत.

उद्घाटन प्रसंगी चेकिन रियॅलिटी चे मालक हरिष लालवाणी व पवण लालवाणी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.