Pimpri – भोसरीतील कॉलनीमधील नामफलकाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते अनावरण

एमपीसी न्यूज  – भोसरीतील चक्रपाणी वसाहत, देवकर वस्ती अशा 20 कॉलनीमध्ये आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते नामफलकाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानिमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच दिनदर्शिकेचे देखील वाटप करण्यात आले.

यावेळी नगरसेवक सागर गवळी, उद्योजक देवेंद्र देवकर, माजी सैनिक भानुदास सरतापे, पांडुरंग गवळी, अनिल लांडगे, भानुदास लांडगे, सोमनाथ देवकर, अशोक देवकर, तुकाराम देवकर, संतोष तापकीर, तुषार फुगे, विशाल मुव्हे, शिवाजी फुगे, सूरज पाचर्णे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या आठदिवसांपासून विविध लोकोपयोगी कार्यक्रम सुरु आहेत. भोसरीतील चक्रपाणी वसाहत, देवकर वस्ती अशा 20 कॉलनीमध्ये आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते नामफलकाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानिमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच दिनदर्शिकेचे देखील वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवेंद्र देवकर यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले. तर, नगरसेवक सागर गवळी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.