Vadgaon Maval News : श्रीमंत महादजी शिंदे उद्यानात लायन्स ओपन जिमचा उदघाटन सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज –  श्रीमंत महादजी शिंदे उद्यानात लायन्स ओपन जिमचा उदघाटन सोहळा लायन्स क्लबचे प्रांतपाल ला. राज मुछाल यांच्या शुभहस्ते, वडगांवचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे प्रभारी भास्कर अप्पा म्हाळसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी नगरसेवक प्रविण चव्हाण, ॲड.विजय जाधव, राजेंद्र कुडे, किरण म्हाळसकर, प्रसाद पिंगळे, राहुल ढोरे, चंद्रजित वाघमारे, वडगांव शहर भाजपा अध्यक्ष किरण भिलारे, सरचिटणीस रविंद्र म्हाळसकर, श्री पोटोबा देवस्थान विश्वस्त सचिव अनंता कुडे,माजी सरपंच संभाजी म्हाळसकर , माजी उपसरपंच सुधाकर ढोरे, जेष्ठ नेते अनिल गुरव, मावळ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस रविंद्र काकडे , शंकर भोंडवे, माजी  सरपंच नामदेव भसे, जेष्ठ नेते यदुनाथ चोरघे, वसंत भिलारे,  मावळ तालुका भाजपा क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारींगे, अरुण सुळके, उदय टकले आदी उपस्थित होते

विशेषतः युवा वर्ग आणि जेष्ठ नागरिकांना त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबाबतीत त्यांच्या वेळेनुसार आणि शरीराला पोषक ठरतील अशी एकूण 7 अत्याधुनिक व्यायामाची यंत्रे लायन्स ओपन जिममध्ये बसविण्यात आलेली आहेत.

वडगांव नगरपंचायतीचे नगरसेवक आणि वडगांव शहर भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे यांच्या सहयोगातून या प्रकल्पाची निर्मिती करण्यांत आली.

प्रांतपाल राज मुछाल यांनी भाषणात लायन्स क्लब ऑफ वडगांव आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने यापुढेही लोकोपयोगी प्रकल्प संपन्न व्हावेत ही अपेक्षा व्यक्त केली.

मावळ भाजपा प्रभारी भास्कर म्हाळसकर यांनी लायन्स क्लब ऑफ वडगांवच्या 32 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीचा आढावा घेत नगरसेवक प्रसाद पिंगळे यांच्या सहयोगातून संपन्न झालेल्या उपक्रमाचे कौतुक करत असे उपक्रम यापुढेही व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी या प्रकल्पाला शुभेच्छा देत भविष्यात देखील नगरपंचायत वडगांव आणि लायन्स क्लब ऑफ वडगांव यांचे अनेक संयुक्त प्रकल्प संपन्न होतील याकामी नगरपंचायतीचे पूर्ण सहकार्य राहील असे मत व्यक्त केले.

नगरसेवक प्रसाद पिंगळे यांनी आपल्या मनोगतात लायन्स क्लब ऑफ वडगांवचे आभार मानत आजपर्यंत त्यांनी केलेल्या नागरिकांच्या तंदुरुस्त  आरोग्यासाठीच्या विविध उपक्रमाचाच हा भाग असल्याचे नमूद केले.

लायन्स क्लब ऑफ वडगांव चे संस्थापक अध्यक्ष ॲड.दामोदर भंडारी, अध्यक्ष दिलीप मुथा, माजी अध्यक्ष एमजेएफ सुनीत कदम, गुलाब म्हाळसकर, डॉ.नेमीचंद बाफना, बाळासाहेब बोरावके, संतोष चेट्टी, प्रदीप बाफना, जितेंद्र रावल, नंदकिशोर गाडे , झुंबरलाल कर्णावट, ऍड.चंद्रकांत रावल, संजय भंडारी, आनंद छाजेड, संजय गांधी, आदिनाथ ढमाले, प्रशांत गुजराणी, योगेश भंडारी, आदींनी नियोजन केले.

सूत्रसंचालन भूषण मुथा यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रकल्प प्रमुख अमोल मुथा यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.