Aakurdi : ‘आप’च्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवडच्या  नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आकुर्डी, निगडी प्राधिकरण येथे आपचे महाराष्ट्र अध्यक्ष रंगा राचुरे यांच्या हस्ते झाले. 

यावेळी आम आदमी पार्टीने राष्ट्रीय जनसंपर्क अभियानाअंतर्गत missed call campaign सुरू केले आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये 9871010101 नंबर जाहीर करून सुरुवात करण्यात आली. पिंपरी-चिंचवडच्या सर्व नागरिकांना या नंबर वर मिस्ड कॉल देऊन पक्षाशी जोडून घेण्याचे आवाहन यावेळी आप युवा अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केले. यावेळी के. टी. बारापात्रे, माजी सहाय्यक आयुक्त, जीएसटी यांनी व इतर अनेक नागरिकांनी पक्षात प्रवेश केला.

यावेळी मार्गदर्शन करताना आपचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी सांगितले की, सामान्य जनतेच्या सर्व समस्यांचे मूळ हे राजकारणात आहे. ग्रामीण भागात शाळांची बिकट अवस्था असो किंवा पाण्याचा प्रश्न असो हे राजकरण सुधारल्यावर सहज सुटतात. हे दिल्लीत आपच्या सरकारने दाखवून दिले आहे. कार्यकर्त्यांनी हे प्रश्न महाराष्ट्रात सोडवण्यासाठी पक्ष सत्तेत आलाच पाहिजे. या जिद्दीने कुठलाही संकोच न बाळगता काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

तसेच महाराष्ट्राचे आपचे युवा आघाडी अध्यक्ष यांनी येऊ घातलेल्या औरंगाबाद पालिका निवडणुकीत आप पूर्ण ताकदीने उतरत असल्याचे सांगितले. आप तेथे सर्व जागा लढवत आहे व लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी बोलताना आपचे पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी आप पिंपरी चिंचवडमध्ये टक्केवारीचे राजकारण नक्की मोडून काढेल, अशी आशा व्यक्त केली. यावेळी आपचे पुणे जिल्हा संघटन मंत्री अभिजित मोरे व युवा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य संदीप सोनवणे यांनी दिल्ली सरकारच्या कामापासून प्रेरणा घेऊन इथे पक्ष विस्तार कसा करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी आलेल्या शहरातील अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आपचे पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष अनुप शर्मा, महिला अध्यक्ष स्मिता पवार, पुणे जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष वहाब शेख व पिंपरी चिंचवडचे अल्पसंख्यांक अध्यक्ष यशवंत कांबळे व पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षविस्तार अंतर्गत पक्षाने काही नवीन पदनियुक्त्या केल्या त्या पुढील प्रमाणे – राज चाकने, अध्यक्ष , पिंपरी चिंचवड युवा आघाडी रितेश भामरे, सचिव , पिंपरी चिंचवड युवा आघाडी धैर्यशील लोखंडे , कोषाध्यक्ष , पिंपरी चिंचवड युवा आघाडी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.