BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : ‘भीमसृष्टी’चे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारलेल्या भीमसृष्टीचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज (बुधवारी) उद्घाटन झाले.

यावेळी महापौर राहुल जाधव, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार गौतम चाबुकस्वार,  स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेविका वैशाली घोडेकर, सुलक्षणा धर, नगरसेवक राहुल भोसले, समीर मासुळकर, आरपीआयच्या सचिव चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते.

…अशी आहे भीमसृष्टी!

भीमसृष्टीमध्ये 19 म्युरल्स बसविण्यात येणार आहेत. यामध्ये माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना 26 नोव्हेंबर 1946 रोजी राज्यघटना सुपूर्द करताना, नागपूर येथील दीक्षाभूमी येथे केलेले भाषण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कुटुंबीयांसमवेत असलेला फोटो, प्रबुद्ध भारत मुकनायाकाचे लायब्ररीत टेबलावर लिखाण करताना, मानगाव परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दलितांचा नेता घोषित करताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज अशा वेगवेगळ्या घटनांचे म्युरल्स येथे असणार आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.