Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथील कंपोस्ट खतनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

क्लिन पिंपळे सौदागर, गारबेज फ्री पिंपळे सौदागर

एमपीसी न्यूज –  पिंपळे सौदागर येथील ग्रीन पन्डा एनव्हायरो सिस्टिम एलएलपीमार्फत पिंपळे सौदागर येथील राधाई नगरी सोसायटीमध्ये १०२ फ्लॅट मधील ओल्या कचऱ्यापासून ६० किलो क्षमता वजनी कंम्पोस्ट खत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले की ,” पिंपळे सौदागरची स्मार्ट सिटी साठी करण्यात आलेली निवड ही पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांनी सतत आपल्या सहभागातून/योगदान मार्फत योग्य ठरवली आहे. प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावत बरोबरीने ओला कचरा विल्हेवाट या गंभीर प्रश्नावर मात करण्यासाठी तसेच यातून मार्ग काढण्यासाठी महानगरपालिकेला करत असलेल्या या अमूल्य सहकार्य केले. जनजागृती बद्दल विशेष आभार मानले.

स्मार्ट सिटी ही फक्त पायाभूत सुविधेमुळे स्मार्ट होत नसते तर ती सुविधा भोगणारी जनशक्ती सुद्धा स्मार्ट असावी लागते आणि पिंपळे सौदागर वासियांनी हे स्मार्टपणा सतत सिद्ध करून दाखवले आहे.

सौदागरमधील काही सोसायटीमध्ये कंपोस्ट खत प्रकल्प राबविण्यात आले आहे तरी परिसरातील इतर सोसायटी आणि गृहनिर्माण संस्थांनी देखील अशाच पद्धतीने कंपोस्ट खत प्रकल्प राबवावे तसेच यामध्ये तयार होणाऱ्या खताचा आपल्याच सोसायटी परिसरातील गार्डनमध्ये वापर करता येईल. तसेच एक लोकप्रतिनिधी या नात्याने कंपोस्ट खत प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी सकारात्मक आहे.”

राधाई नगरी को.ऑप.हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष विवेक फलक, सेक्रेटरी डॉ.दिपाली गायकवाड, खजिनदार केतन शहा, पिंपळे सौदागर विभागाचे आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई, ग्रीन पॅन्डा एन्व्हायरो सिस्टिमचे पार्टनर गणेश शिंदे, सौरभ पुरोहित, विजय देशपांडे, शंकर हांडे, उज्वल देशपांडे, संजय होने, पराग देशमुख, प्रतिभा शर्मा, संकेत गुप्ता, राहुल गायकवाड, रितु गायकवाड, कविता पानघंडी, संध्या पानघंडी, अपर्णा कुलकर्णी, वैशाली शहा, पौर्णिमा श्रॉफ, विजय श्रॉफ, प्रमोद कुलकर्णी, वसुंधरा देशपांडे, रूपाली जैन, सोनम जैन, रमेश काटे, किरण जैन, राहुल जैन, किशोर देशमुख, संजय शेलार, मनोज खोटले, लातूरकर, प्रशांत सावंत, पंकज सावेकर व आदी सभासद उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.