Vadgaon Maval News : नायगाव मध्ये काँक्रीट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – नायगाव ग्रामस्थांची वर्दळ असलेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे उद्घाटन कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांच्या हस्ते करण्यात आले. रस्त्याच्या कामाला त्वरित सुरुवात करण्यात आली.

दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रस्त्याचे काम होण्याकडे लक्ष देणार असुन वडगाव – कामशेत गटातील गावांना जिल्हा परिषदे कडून भरघोस निधी उपलब्ध करून देणार आसल्याचे वायकर यांनी सांगितले.

याप्रसंगी चिखलसे विकास सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब लालगुडे, ग्रामपंचायत सदस्य बाबाजी चोपडे, अंकुश चोपडे, मुलाणी, सुनील चोपडे,चंद्रकांत चोपडे,जगन्नाथ शेवाळे, काळू चोपडे,रघुनाथ चोपडे, मोहित कदम व ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.