Pune : एस.एम.जोशी कॉलेजमध्ये आयडिया लॅबचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – हडपसर येथील एस. एम. जोशी कॉलेज या ठिकाणी आयडिया लॅबचे उद्घाटन संपन्न झाले. आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे व नाविन्यपूर्ण संशोधनाचे युग आहे. आयडिया लॅबसारख्या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनांना वास्तव रूप मिळण्याचे उपलब्ध झाले आहे.  विविध वैज्ञानिक शास्त्रे, कृषी, औषधे, इलेक्ट्रीक उपकरणे अशा विविध क्षेत्रात आपल्या कल्पनांना मूर्त रूप प्राप्त होऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक वैज्ञानिक डॉ. भारत काळे यांनी केले.   

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मिलिंद कुलकर्णी होते. ते म्हणाले, संशोधनाची विविध क्षितिजे आजच्या तरुणाईला खुणावत आहेत. अशा वेळी राष्ट्रीय पातळीवर आपल्या विचारांचा ठसा उमटविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यात त्यांनी स्वतः ला झोकून देऊन कार्यक्षमता सिद्ध करावी असा व्यक्त केला.

या कार्यक्रमास ट्रांसफिनाईट इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स प्रा. लिच्या सतीश जावळे, आशुतोष कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. बी. आडे यांनी मनोगते व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरविंद बुरुंगले यांनी आपल्या मनोगतात रयत शिक्षण संस्थेचे वेगळेपण मांडत आपल्या महाविद्यालयाने कर्मवीरांचा वसा कसा जपला आहे ते स्पष्ट करीत आयडिया लॅब हे ऍप विद्यार्थ्यांच्या जीवनात नवसंजीवनी ठरणारे आहे असे मत केले. आनंद सुतार या विद्यार्थ्याने आपली कॅन्सरवरील आयडिया मांडली. उपप्राचार्य डॉ.महादेव जर, डॉ.मनीषा सांगळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. डॉ.आनंद हिप्परकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शकुंतला सावंत यांनी केले.

HB_POST_END_FTR-A2
You might also like