Pune : जुन्नर येथे खासदार कोल्हे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आज शुक्रवारी (दि.15) माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत खासदार अमोल कोल्हे यांच्या आई रंजना कोल्हे यांच्या हस्ते नारायणगाव येथे करण्यात आले.

यावेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके, शिरूरचे आमदार अशोक पवार, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पांडुरंग पवार, जिल्हा परिषद गटनेते शरद लेंडे, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार अमोल कोल्हे यांच्या amolrkolhe.com या संकेत स्थळाचेही अनावरण करण्यात आले. या संकेतस्थळाद्वारे नागरिकांना कोल्हे यांच्याशी त्वरित संपर्क साधता येईल. संपर्क प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या समस्या संपर्क खासदारापर्यंत पोहोचविता येतील. यावेळी मतदार संघातील मुख्य कार्यालय व हडपसर कार्यालय यांचे संपर्क क्रमांक नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात आले.

नागरिकांनी त्यांच्या समस्यांसाठी हडपसर कार्यालय 9697792424, नारायणगाव कार्यालय – 9697802424, दूरभाष क्रमांक – 02132-242424, email – [email protected] यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना सर्वोतोपरी तातडीने सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.