Talegaon Dabhade: नवीन समर्थ विद्यालय ज्युनियर कॉलेज अॉफ सायन्सचे उदघाटन

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालय ज्युनियर कॉलेज आॅफ सायन्सचे  मंगळवारी (दि.०१) संस्थेचे अध्यक्ष संजय (बाळा)भेगडे यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले.

यावेळी महेशभाई शहा, नंदकुमार शेलार, राजेश म्हस्के, सुरेशभाई शहा, गणपत काळोखे गुरूजी, सोनबा गोपाळे गुरूजी, वसंत भेगडे, प्राचार्य कैलास पारधी, शंकर नारखेडे, ललितकुमार वधवा आदी उपस्थित होते.

याप्रसंगी  भेगडे म्हणाले, ११वी, १२वी मध्ये विद्यार्थ्यांनी पाया भक्कम केला पाहीजे आपणास शिक्षणाची जी संधी मिळाली आहे त्याचा फायदा घ्या, मोठी स्वप्ने बाळगा हि संस्था अग्रेसर राहणेसाठी माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचा मोठा वाटा आहे.

संस्थेचे सचिव संतोष खांडगे म्हणाले, विद्यार्थ्यांनी कॉलेजचे नाव व स्वतःचे नाव मोठे केले पाहीजे, त्याचबरोबर जबाबादारीने वागले पाहिजे. विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी यासाठी ज्युनियर कॉलेजची मंजुरी आणली आहे.

तसेच  डॉ.गिरीष देसाई म्हणाले, विद्यार्थ्यांनी पुढे काय व्हायचे याबाबत नियोजन आत्ताच केले तर ऐनवेळी गोंधळ होणार नाही.

यानंतर शुभांगी सफई, अथर्व होमकर, सिध्देश जाधव, आदित्य कराळे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रास्ताविक डाॅ जयश्री सुरवसे यांनी केले. सुत्रसंचालन ज्ञानदेव रणशूर यांनी केले. आभार महेशभाई शहा यांनी मानले तर कार्यक्रमाचे नियोजन पांडुरंग पोटे सर, संजय कसाबी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.