Pimpale Saudagar: पिंपरी चिंचवड थायबॉक्सिंग चँपियनशिपचे उदघाटन

एमपीसी न्युज : लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे व नगरसेविका शितल नाना काटे व नाना काटे सोशल फाउंडेशन आणि शार्प कराटे अँड किक बॉक्सिंग स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 17 वी पिंपरी चिंचवड थायबॉक्सिंग चँपियनशिप 2022-23 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापून त्यांच्या दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या स्पर्धेत 04 वर्ष ते 19 वर्ष वयोगटातील एकूण 297 स्पर्धकानी सहभाग घेतला.

यावेळी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसइंद्रायणी नदी रासायनिक पाण्यामुळे फेसाळलीचे अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, राष्ट्रवादी प्रदेश विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष इमरान शेख, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी क्रीडासेल अध्यक्ष समिता गोरे, स्थायी समिती माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक कैलाश थोपटे, राजेंद्र जगताप, राजेंद्र साळुंखे, हरिभाऊ तिकोने , राजू लोखंडे, अरुण पवार, गोरक्षनाथ पाषाणकर, युवा नेते श्याम जगताप, तानाजी जवळकर, शेखर काटे, सागर कोकणे, प्रशांत सपकाळ, अभिजीत आल्हाट, काळुराम कवितके, उद्योजक धीरेंद्र सेंगर,माऊली हांडे ,अर्जुन काटे ,बाळासाहेब काटे ,मिलिंद काटे ,प्रमोद काटे ,राजेंद्र काटे ,शिवाजी डोंगरे , पोपट जगताप, ज्ञानेश्वर काटे ,सुरेश काटे ,शंकर काटे ,गोविंद काटे ,संजय देवराम काटे ,राजू कुटे , उमेश काटे , पराग त्यागी ,सचिन देसाई ,हभप गणेश काटे ,देवा भिसे ,तुषार जळमकर , आदी उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे नगरसेविका शितलताई नाना काटे यांनी आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.