Pune – महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत प्रीव्ह्यू थिएटरचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील स्कूल ऑफ मीडिया ॲक्टीव्हिटी, रिसर्च अँड टेक्नोलॉजी अर्थात ‘स्मार्ट’ या विभागातील ‘स्मार्ट टॉकीज’ या आधुनिक प्री व्ह्यू थिएटरचे उद्घाटन नुकतेच ‘दी केरला स्टोरीज’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन (Pune) यांच्या हस्ते संपन्न झाले.

Chikhali Murder : मित्रानेच केला घात, वीस वर्षीय तरुणाची गोळ्या घालून हत्या

यावेळी चित्रपटाचे निर्माते विपुल शाह, मुख्य अभिनेत्री अदा शर्मा, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव, सचिव डॉ पी व्ही एस शास्त्री, विश्वस्त मिलींद लेले, स्कूल ऑफ मीडिया ॲक्टीव्हिटी, रिसर्च अँड टेक्नलॉजी विभागाच्या संचालिका राधिका इंगळे, विभागाचे समन्वयक देवदत्त भिंगारकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

‘स्मार्ट‌ ’तर्फे माध्यम क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थीनींसाठी सावित्रीबाई फुले पुणे (Pune) विद्यापीठाशी संलग्न असलेला ‘बी- व्होक मीडिया अँड एन्टरटेंन्मेट’ हा पदवी अभ्यासक्रम राबविला जातो. या अंतर्गतच थिएटरची निर्मिती करण्यात आली असून प्री व्ह्यू थिएटरमध्ये एकाचवेळी ३२ जण चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात.

थिएटरमधील साउंड सिस्टिम, स्क्रिनसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याची माहिती यावेळी राधिका इंगळे यांनी दिली. उद्घाटन करण्यात आलेले प्री व्ह्यू थिएटर हे शिक्षण संस्थेतील अशाप्रकारचे शहरातील पहिलेच थिएटर आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना सुदिप्तो सेन म्हणाले की, “कलेमध्ये समाजमन बदलविण्याची आणि ते घडविण्याचीही क्षमता असते. चित्रपट हा सामाजिक बदलांमध्ये महत्त्वाचे आणि प्रभावी साधन म्हणून काम करतो. युरोपियन रेनेसांमध्ये लिओनार्डो दा विंची, मायकल एंजलो या सारख्या कलाकारांनी देखील आपल्या कलेच्या माध्यमातून बदलांचे साक्षीदार होण्याचे प्रयत्न केले.

रशियन राज्यक्रांतीमध्ये देखील आपल्याला अशी उदाहरणे दिसून येतात. आज अशाच प्रकारे एका महत्त्वाच्या विषयावर नागरिकांना जागरूक करण्याचे काम आमच्या चित्रपटाच्या माध्यमातून होताना दिसत आहे, याचा आम्हाला आनंद आहे.’’

चित्रपट किती कोटींची कमाई करतोय हे आमच्यासाठी महत्त्वाचे नसून किती कोटी नागरिक चित्रपट पाहतायेत हे जास्त महत्त्वाचे असल्याचे देखील यावेळी सेन यांनी नमूद केले.

राधिका इंगळे यांनी प्रास्ताविक केले. (Pune) देवदत्त भिंगारकर यांनी आभार मानले. यानंतर संस्थेतील विद्यार्थीनींसाठी ‘दी केरला स्टोरीज’ चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.