Pimpri : फुल विक्रेत्यांना मिळाली हक्काची जागा, फुलबाजाराचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज  – शगुन चौकातील फुल विक्रेत्यांना हक्काची जागा मिळाली आहे. क्रोमा शॉपिंगमॉल जवळील मोकळया जागेत उभारण्यात आलेल्या नवीन फुलबाजाराचे उद्घाटन महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते आज (गुरुवारी) झाले. यामुळे शगुन चौकातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.

अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, स्वीकृत सदस्य माऊली थोरात, ह प्रभाग नामनिर्देशित सदस्य कुणाल लांडगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता प्रदीप पूजारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर, मुख्य आरोग्य निरीक्षक अजय जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अध्यक्ष राजू मोरे, उपाध्यक्ष दत्ताशेठ फुले, सचिव शिवाजी सस्ते आदी उपस्थित होते.

महापौर म्हणाले, फुल व्यापारी शगुन चौकात रस्त्यावर बसून व्यापार करत होते. त्यानंतर व्यापा-यांच्या संख्या वाढल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर अडथळा होत होता. फुल व्यापारा-यांच्या हक्काच्या जागेबाबत त्यांची सतत मागणी होत होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेने क्रोमा शॉपिंगमॉल जवळील मोकळया जागेत तात्पुरते पत्र्याचे गाळे उपलब्ध करून दिले आहेत. तसेच भविष्यात काही अडचणी उद्भवल्यास महापालिकेमार्फत सोडविल्या जातील असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे खुशाल पुरुंदरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.