Talegaon News : शिवणे-सडवलीमध्ये विविध विकास कामाचे उद्घाटन

तळेगाव दाभाडे – नुकतेच ग्रुप ग्रामपंचायत शिवणे – सडवली येथे विविध विकास कामाचे उद्घाटन मावळचे आमदार सुनील शेळके व जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे सदस्य साहेबराव कारके, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरत शिंदे, विशाल वहिले, संजय शेडगे, भरत भोते,  सोनाली माळवदकर, राधिका वाळुंज, कविता बदर, चिंधु वाळुंज, लक्ष्मण वाळुंज, किसन कुंभार, राजू शिवणेकर, संतोष शिंदे, महेश मस्के, विकास उभे, अजित चौधरी, उमेश बोडके, अनिता लोहकरे, भागुजी कंठे, सखाराम गायकवाड, बाबूराव नगिजे, शांताराम मस्के, भरत मस्के, अमोल शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.
_MPC_DIR_MPU_II
यावेळी शिवणे येथील रस्ता काँक्रिटीकरण, वाळुंजवाडी येथील रस्ता व पथदिवे, दलित वस्ती मधील रस्ता व हायमास्ट दिवे आदी कामाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
 याप्रसंगी आमदार सुनील शेळके व बाबुराव वायकर यांनी ग्रामस्थांचे आभार मानून भविष्य काळामध्ये अधिक विकासकामासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.