Chakan News : वासुली गावात दरोड्याची घटना; सुरक्षा रक्षकावर चाकूने वार

एमपीसी न्यूज – ड्युटी संपवून पायी चालत घरी जात असलेल्या एका सुरक्षा रक्षकाला त्याच्याकडील पैसे मागत तिघांनी चाकूचा धाक दाखवला. पैसे देण्यास सुरक्षा रक्षकाने नकार दिला असता सुरक्षा रक्षकाच्या पोटात चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 16) रात्री घडली.

उल्हास शिवाजी एडके (वय 35, रा. वासुली, ता.खेड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे तौरल इंडिया प्रा ली या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. गुरुवारी ते ड्युटी संपवून रात्री पावणे बाराच्या सुमारास त्यांच्या घराकडे पायी चालत जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून एका दुचाकीवरून तिघेजण आले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून ‘तुझ्या जवळील पैसे आम्हाला दे’ असा दम दिला. एडके यांनी नकार दिला असता आरोपींनी एडके यांच्या पोटात चाकूने वार केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.