BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात 19 ठिकाणी झाडपडीच्या घटना

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी सायंकाळी झालेल्या पावसात 19 ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभाग आणि काही ठिकाणी पोलिसांनी झाडे हटविण्यास मदत केली.

पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. पावसासोबत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा देखील होता. शहरात यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनांची माहिती स्थानिक नागरिकांनी तसेच पोलिसांनी अग्निशमन विभागाला दिली. पोलिसांच्या मदतीने अग्निशमन विभागाने सर्व झाडे बाजूला केली.

पिंपरी-चिंचवड शहरात या ठिकाणी घडल्या झाडपडीच्या घटना –

# कामगार नगर पिंपरी
# निगडी प्राधिकरण महापौर बंगल्यासमोर जाधववाडी चिखली
#पत्राशेड चिंचवड
# मासुळकर कॉलनी पिंपरी
# गांधी गार्डन उद्यमनगर
# म्हेत्रे गार्डन जवळ चिखली
# थरमॅक्स चौक चिंचवड
# कृष्णानगर आकुर्डी
# एच ए कॉलनी पिंपरी
# वल्लभनगर पिंपरी
# गुरुविहार कॉलनी भोसरी
# कस्तुरी मार्केट चिखली
# कुणाल हॉटेल जवळ रहाटणी
# खराळवाडी पिंपरी
# नेहरूनगर पिंपरी
# एच ए कंपनी जवळ पिंपरी
# सेक्टर 26 प्राधिकरण
# वल्लभनगर पिंपरी

HB_POST_END_FTR-A1
.