Pune : समाविष्ट 11 गावांतील विकासकामे मार्गी लावा ; महापौरांच्या बैठकीत दीपक मानकर, गणेश ढोरे यांची मागणी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांत विकासकामे मार्गी लावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर, नगरसेवक गणेश ढोरे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांची शुक्रवारी भेट घेऊन केली. यावेळी गावकऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

शिवणे, उत्तमनगर, धायरी, आंबेगाव खु, आंबेगाव बु, फुरसुंगी, उरुळी देवाची, साडेसतरानळी, उंडरी, केशवनगर, लोहगाव या 11 गावांत पाणी, कचरा, रस्त्यांची अवस्था बिकट आहे. महापालिकेत समावेश झाल्यावर विकासाची अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरत आहे. केवळ बांधकामांवर जोरात कारवाई होत असल्याचा आरोप गणेश ढोरे यांनी केला.

समाविष्ट गावांतील नागरिक हे आपलेच नागरिक आहेत. त्यांच्या विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे दीपक मानकर म्हणाले. तर, समाविष्ट गावांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.