Pune : समाविष्ट 11 गांवात रस्त्यांची दुर्दशा, पिण्याच्या पाण्याची टंचाई – गणेश ढोरे  

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत 2017 मध्ये समाविष्ट झालेल्या 11 गावांत सर्वप्रथम रस्ते आवश्यक आहेत. त्याशिवाय हॉस्पिटल, गार्डन, नाट्यगृह यासह इतर कोणत्याही सोयीसुविधा देता येत नाही. शिवणे, उत्तमनगर, फुरसुंगी, उरुळी देवाची, उंडरी, साडेसतरानळी, केशवनगर, लोहगाव, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, धायरी या 11 गावांत रस्त्यांची बोंबाबोंब आहे. वारंवार मागणी करूनही सत्ताधाऱ्यांसह महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप समाविष्ट गावांतून नगरसेवक झालेले गणेश ढोरे यांनी केला.

रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याचेही त्यांनी सांगितले. एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून पुणे शहरात उद्याने, रस्ते करण्यात येतात. हाच न्याय गावांनाही का लावला जात नाही? महापालिकेत समावेश झाल्यानंतर गावांचा विकास होणार असल्याची आशा होती. मात्र, भाजपच्या कारभारामुळे गावांचा विकासच होत नसल्याचे ढोरे म्हणाले. सर्वसाधारण सभेत आपण वारंवार आवाज उठवतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.