Pune News : मिळकत कराच्या अभय योजनेला 26 जानेवारी पर्यंत मुदत वाढ

एमपीसी न्यूज : कोविड च्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिके चे उत्पन्न वाढावे म्हणून अभय योजने ला मुदत वाढ देण्यात आली आहे. हि योजना प्रजासत्ताक दिना पर्यंत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

अभय योजनेला  मुदत वाढ दिली असुन  10 ते 31 डिसेंबर पर्यंत दंड भरण्यासाठी 75% सवलत तथा 1 ते 26 जानेवारी पर्यंत दंड भरण्यासाठी 70% सवलत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ आता पर्यंत 1 लाख 14 हजार लोकांनी घेतला आहे. या योजने पासून अजून 4 लाख 52 हजार लोक प्रलंबित आहेत.

ही योजना ऑक्टोबर मधे राबविण्यात आली होती. या योजने मधून पालिकेला 354 कोटी चा महसूल भेटला. या योजनेला पुन्हा मुदत वाढ दिल्याने महापालिकेचे महसूल उत्पन्न वाढीस मदत होईल. तरी पुण्यातील सर्व नागरिकांनी या संधी चा लाभ घ्यावा, असे आवाहन रासने यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.