Income Tax Filing : आयकर भरण्यासाठीच्या 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – केंद्रीय अर्थ मंत्रालयानं वैयक्तिक आयकरदात्यांना 2019-2020 या वर्षातील कर भरण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत वेळ वाढवून दिली आहे. मंत्रालयानं शनिवारी ही माहिती दिली. आयकर भरण्यासाठी यापूर्वी 30 नोव्हेंबर ही अंतिम तारीख होती.

केंद्र सरकारनं 13 मे रोजी आयकर भरण्यासाठी निश्चित केलेली 31 जुलैपर्यंतची तारीख वाढवून 30 नोव्हेंबर केली होती. कोरोना संकटामुळे करदात्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे 31 जुलैपर्यंतच्या कालावधी वाढवण्यात येत असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं त्यावेळी म्हटलं होतं.

प्राप्तीकर अधिनियमानुसार ज्यांच्या खात्यांचं ऑडिट करणं आवश्यक आहे, अशा करदात्यांसाठी (त्यांच्या भागादारांसह) आयकर विवरणपत्र देण्याची तारीख 31 ऑक्टोबरऐवजी 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे कोरोना व लॉकडाउनमुळे आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.