Pimpri : इनकम टॅक्स, विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी संघांची विजेतेपदासाठी लढत !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धा 

एमपीसी न्यूज –  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्, सोशल अँड कल्चरल अ‍ॅकॅडमीतर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत इनकम टॅक्स व विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरू नगर-पिंपरी येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इनकम टॅक्स, पुणे संघाने सुपर इलेव्हन संघाचा ५-० असा सहज पराभव केला.

विजयी संघाकडून नितीन कुमार, आशुतोष लिंगेश, शिवदीप, सोनु दलाल आणि आशिष छेत्ती यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी अ संघाने फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघाचा पेनल्टी शुट आऊटमध्ये ४-३ असा पराभव केला. पिल्ले अ‍ॅकॅडमी संघाकडून रूबेन केदारी व देवेंद्र वाल्मिक आणि शुभम चावरे यांनी गोल करून संघाचा विजय सोपा केला.

स्पर्धेचा सविस्तर निकालः उपांत्य फेरीःइनकम टॅक्स, पुणेः ५ (नितीन कुमार १२ मि., आशुतोष लिंगेश २२ मि., शिवदीप २६ मि.; सोनु दलाल ४२ मि., आशिष छेत्ती ५३ मि.) वि.वि. सुपर इलेव्हनः ०; हाफ टाईमः ३-०;विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी अः २, २ (रूबेन केदारी १८ मि., देवेंद्र वाल्मिक ३७ मि., देवेंद्र वाल्मिकी, शुभम चावरे) वि.वि. फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाः २, १ (वैंकटेश देवकर २५ मि., रोहन देवकर ३६ मि., प्रवित नाईक); हाफ टाईमः १-१;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.