Maharashtra Bhushan : ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या रकमेत वाढ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या रकमेत वाढ (Maharashtra Bhushan) करण्यात आली असून ही रक्कम दहा लाखांवरून 25 लाख रुपये करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Pimpri News : राष्ट्रवादीचे आमदार बनसोडे शिंदे गटाच्या मार्गावर? मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून केला प्रवास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या अनुषंगाने बैठक झाली. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच पुरस्कार समितीचे सदस्य ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ विधीज्ज्ञ अँड. उज्ज्वल निकम, प्रा. शशिकला वंजारी, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत आदी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.