Khadakwasla Dam Update : खडकवासला धरणातील पाण्यात वाढ झाल्याने 14 हजार क्यूसेक विसर्ग

एमपीसी न्यूज : गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज सकाळी 8 वाजता खडकवासला (Khadakwasla Dam Update) धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 9417 क्युसेक्स विसर्ग वाढवून 13,981 क्यूसेक्स करण्यात आला.

तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे अशी माहिती खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता यो.स.भंडलकर यांनी दिली. यासोबतच वरसगाव धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सकाळी 6 वाजता धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रामध्ये 8 हजार 530 क्यूसेक्स व विद्युत निर्मिती केंद्रद्वारे 600 क्यूसेक्स म्हणजे एकूण 9 हजार 130 क्यूसेक्स विसर्ग सुरू केले.

तसेच ते पुढे म्हणाले, की सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात (Khadakwasla Dam Update) यावीत.

Mulshi : सायरुंग डेव्हलपर्सच्या कार्यकारी संचालक नंदिनी कोंढाळकर यांना अटक

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.