Khed News : खेड मधील कोरोना रुग्ण संखेत वाढ, १०४ नवीन रुग्ण तर ५१जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात पुन्हा एकदा रुग्ण संखेत वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत आहे असे वाटत असतानाच पुन्हा रुग्ण संख्या वाढ होत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.  खेड तालुक्यात बुधवारी (दि. २१ ) ३४ गावे आणि ३ पालिकांमध्ये १०४ रुग्ण मिळून आले आहेत.

खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा ३३ हजार ५६ झाला आहे. यापैकी ३२ हजार २३६ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. बुधवारी दिवसभरात ५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत ३४९ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा ४७१ एवढा आहे.

सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात ९३ रुग्ण, चाकण ५, आळंदी १, राजगुरुनगर ५ असे एकुण १०४ नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली. खेड तालुक्यात बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
भांबोली, दावडी,धामणे,गोनवडी, कडूस, काळेचीवाडी , कान्हेवाडी ,कुरुळी ,मरकळ, मेदनकरवाडी , संतोषनगर, शेलू , शिवे, वडगाव घेनंद ,वाकी खु. ,वासुली या गावांमध्ये प्रत्येकी १ रुग्ण मिळाला आहे.

आंबेठाण ,कडाचीवाडी ,खराबवाडी , वाडा या गावांमध्ये प्रत्येकी २ रुग्ण मिळाले आहेत. डेहने,  पाईट , सातकरस्थळ या गावांमध्ये प्रत्येकी ३ रुग्ण मिळाले आहेत. बहुळ, कनेरसर, सिद्धेगव्हाण, वाफगाव,केळगाव,किवळे या गावांमध्ये प्रत्येकी ४ रुग्ण मिळाले आहेत.  चऱ्होली खु., महाळुंगे या गावांमध्ये प्रत्येकी ५ रुग्ण मिळाले आहेत.  कोयाळी मध्ये ६ तर कुरकुंडी  व शेलपिंपळगाव मध्ये  प्रत्येकी १० रुग्ण मिळाले आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.