PCMC : नाट्यगृहाच्या भाड्यात वाढ, गदिमा नाट्यगृह भाडेतत्त्वावर देणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) अंकुशराव लांडगे नाट्यगृह, आचार्य अत्रे रंगमंदीर, नटसम्राट निळू फुले रंगमंदीर यांच्या भाड्यात वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच निगडी येथील ग.दि.माडगुळकर नाट्यगृह भाडे तत्वावर देण्यासाठी दरास मान्यता देण्यात आली.

Talegaon : मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुंडा विरोधी पथकाने शिर्डीतून ठोकल्या बेड्या

महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, सौंदर्यीकरण करणे व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अनुषंगिक कामे करण्यास मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे इतर आवश्यक विविध कामांसाठी येणाऱ्या खर्चासही प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या महापालिका स्थायी समिती सभेत आज मान्यता देण्यात आली.  महापालिका दवाखाना, रूग्णालयाकरिता आवश्यक उपकरणे खरेदीस मान्यता देण्यात आली. तसेच पवना नदीच्या शिवणे ते दापोडी या 44 कि.मी  लांबीतील नदीचे सर्व्हेक्षण व सुधारीत पुररेषा आखणी करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

महानगरपालिकेच्या “अ” प्रभागातील जलनि:सारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पद्धतीने साफसफाई  करणे व गाळ काढणेकमी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक केलेल्या मानधनावरील रुग्णवाहिका वाहनचालक पदांना सुधारित किमान वेतनप्रमाणे मानधनात वाढ करण्यास मान्यता देण्यात आली.

मनपाचे ग क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 23, 24 व 27 मधील सार्वजनिक शौचालयांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली. मनपा प्रभाग क्रमांक 12 मधील  रुपीनगर व परिसरातील रस्त्यांची आकस्मित देखभाल दुरुस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.  महापालिकेचे रुग्णालयीन कामकाजासाठी आहार तज्ञ मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट व मॅनेजर आऊट सोर्सिंग द्वारे अनुबंधित एजन्सी मार्फत नेमणूक करण्यात मान्यता देण्यात आली.

शहरातील मुख्य रस्ते महामार्ग व 18 मी पेक्षा मोठ्या रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणे कामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. म प्रभाग क्रमांक 15 मधील महापालिका इमारतींचे दुरुस्तीची कामे करण्याकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच प्रभाग क्र. 15 मधील ज्ञान प्रबोधनी शाळा परिसर दुर्गेश्वर, मंदिर परिसर व इतर भागांमध्ये डांबरीकरणाची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपा प्रभाग क्रमांक 19 बी ब्लॉक भाटनगर व इतर परिसरामध्ये पावसाचे पाणी व्यवस्था, दुभाजक, पेव्हिंग  ब्लॉक व इतर अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या  खर्चास मान्यता देण्यात आली. मनपाचे प्रभाग क्रमांक 14  मध्ये स्थापत्य विषयक कामे करण्याकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपा फ, अ आणि ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध उद्याने देखभाल करणेस मान्यता देण्यात आली. तसेच पुणे,मुंबई हमरस्ता निगडी ते दापोडी रस्ता व रस्त्याच्या बाजूने सुशोभिकरण देखभाल करणेकामी मान्यता देण्यात आली.

अशुद्ध जलउपसा केंद्र रावेत येथील विविध आवश्यक कामांसाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. महानगपालिकेच्या आरोग्य विभागाकडील आवश्यक रिक्त पदे एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात भरण्यास मान्यता देण्यात आली. महापालिका कार्यक्षेत्रातून वाहणाऱ्या पवना नदी पात्रातील टाटा ब्रिज ते बोपखेल या क्षेत्रातील जलपर्णी काढणे कामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.