Covishield Vaccination News : लसीकरण अंतरात वाढ ! ‘कोविशिल्ड’चा दुसरा डोस आता 12 ते 16 आठवड्यानंतर मिळणार

कोवॅक्सिन लसीच्या डोससाठी कोणताही बदल नाही

एमपीसीन्यूज : कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतरात वाढ करण्यात आली आहे. आता हे अंतर 12  ते 16  आठवडे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार गटाने याबाबतच सल्ला दिला होता. त्यानुसार कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतरात वाढ करण्यात आली.

सध्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये 6 ते 8 आठवडे इतके अंतर होते. आता हे अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्यात आले आहे. त्यामुळे कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस थेट 3 ते 4 महिन्यांनंतर देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार गटाने सुचवलेल्या शिफारशी राष्ट्रीय तज्ज्ञांच्या गटाकडे पाठवण्या आल्या होत्या. त्याला आता मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, कोवॅक्सिन लसीच्या डोससाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.