Pune : पवना, मुळशी व खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

एमपीसी न्यूज – मुळशी धरण परिसरात अतिवृष्टीमुळे धरणातून आज रात्री दहा वाजल्यापासून 12 हजार 500 क्यसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर पवना धरणातून 10 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर खडकवासला धरणातून 41 हजार 600 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तसेच पावसाचा जोर पाहून आवश्यकतेनुसार मुळशी धरणातून 15 हजार क्यूसेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. 

हवामान खात्याकडून पूढील ७२ तासात पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. त्यामुळे सुरक्षीततेच्या कारणास्तव पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. तसेच पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.